नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत (S. Sreesanth)ने सात वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा कमबॅक केले. बीसीसीआयद्वारे आयोजित सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो केरळ संघाकडून खेळला. देशांतर्गत किकेट खेळल्यानंतर आता तो खेळण्याचा विचार करतोय. पुढील महिन्यात १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात सहभागी होण्यासाठी त्याने तयारी केली आहे. वाचा- आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी असलेला आवश्यक फिटनेस आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी त्याने दाखवल्या आहेत. श्रीसंतसाठी एक गट मोठा उत्साही आहे. त्याच बरोबर राज्य क्रिकेट संघटना देखील त्याला पाठिंबा देत आहे. वाचा- वाचा- श्रीसंतने मुश्ताक अली ट्रॉफीतील ५ सामन्यात १८ षटके टाकली. यात ९.८८च्या सरासरीने त्याने १७८ धावा दिल्या. गोलंदाज म्हणून तो महाग ठरला असला तरी चार विकेट घेतल्या आहेत. स्पर्धेत त्याने आक्रमक गोलंदाजी केली. आता आयपीएलच्या लिलावात भाग घेण्यास श्रीसंत उत्सुक आहे. पण प्रश्न असा आहे की त्याला खरेदी कोण करणार. वाचा- वाचा- लिलावात एकापेक्षा एक जलद गोलंदाज असताना २०१३ साली स्पॉट फिक्सिंगमुळे सात वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागणाऱ्या श्री संतवर कोणता संघ विश्वास दाखवणार हा मोठा प्रश्न आहे. लिलावात तुम्ही किती मोठे खेळाडू आहात, तुमचा इतिहास काय आहे या गोष्टींना महत्त्व नसते. श्रीसंतच्या चाहत्यांची मात्र इच्छा आहे की त्याने आयपीएल खेळावे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39fUsw5
No comments:
Post a Comment