नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. ब्रिस्बेन मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटीत भारताने ३ विकेटनी विजय मिळवाल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २-१ स्वत:कडे कायम राखली. स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना देखील भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. वाचा- तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारताच्या पराभवासाठी अखिलाडूवृत्ती दाखवली. पण भारतीय संघ आणि खेळाडूंनी मात्र त्याला उत्तर देण्याचे टाळले. चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू याला एक गिफ्ट दिले. त्याने भारतीय संघातील सर्व खेळाडूंची सही असलेली एक जर्सी लायनला भेट दिली. ब्रिस्बेन येथील कसोटी ही लायनचा १००वा कसोटी सामना होता. या जर्सीवर भारताच्या १६ खेळाडूंची स्वाक्षरी होती. वाचा- भारतीय संघाने दिलेल्या या खास भेटीबद्दल लायनने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघ आणि अजिंक्य रहाणेचे आभार मानले आहेत. लायनने या पोस्टमध्ये अजिंक्यला टॅग देखील केले आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्याबद्दल आणि भारतीय संघाचे अभिनंदन. अजिंक्य तु खिलाडूवृत्ती दाखवत जर्सी भेट दिली त्यासाठी आभारी, असे त्याने म्हटले आहे
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a8pw09
No comments:
Post a Comment