मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन बेंगळुरूत पोहोचला. तेथून तो तामिळनाडूमधील गावी जाणार आहे. तर चेन्नईत राहणारे फिरकीपटू आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि गोलंदाजीचे कोच भरत अरुण अद्याप दुबईत आहेत ते शुक्रवारी भारतात येणार आहेत. वाचा- भारतीय संघातील मुंबईचे खेळाडू , रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मुंबईत दाखल झाले. या सर्वांच्या स्वागतासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते. रहाणेने भारतीय संघाच्या विजयाबद्दल केक देखील कापला. मुंबईच्या या खेळाडूंचे जोरदार स्वागत झाले. विमानतळावर चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वाचा- वाचा- मुंबईत गुरुवारी सकाळी पोहोचलेल्या भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक शास्त्री यांना मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सात दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. वाचा- टीम इंडियाचा हंगामी कर्णधार रहाणे, स्टार सलामीवीर शर्मा, गोलंदाज ठाकूर आणि सलामीवीर पृथ्वी यांना खबरदारी म्हणून हा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतील पराभवानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिकेच विजय मिळवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2M82FJV
No comments:
Post a Comment