मुंबई : यावर्षीच्या आयपीएलसाठी महाराष्ट्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण यावर्षी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे आता समोर येत आहे. हे सामने नेमके कुठे होणार आहेत, याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. करोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय यावेळी बीसीसीआयने घेतल्याचे समजते आहे. महाराष्ट्रामध्ये फार कमी अंतरामध्ये बरेच स्टेडियम्स आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आयपीएल एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांना आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा आनंद यावेळी लुटता येऊ शकतो. यावेळी आयपीएलचे साखळी फेरीतील सर्व सामने महाराष्ट्रामध्येच होणार असल्याचे आता दिसत आहे. यासाठी वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय.पाटील स्टेडियम, नवीन मुंबई येथील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील स्टेडियममध्ये आयपीएल सर्वाधिक सामने होणार असल्याचे आता समजते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चाहत्यांना यावर्षी बीसीसीआयकडून आयपीएलचे गिफ्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. आयपीएल सर्व साखळी सामने यावेळी महाराष्ट्रामध्ये खेळवण्यात येणार आहेत. पण आयपीएलचे बाद फेरीतील सामने यावेळी अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भरवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांमध्ये आयपीएलचे सामने हे अहमदाबाद येथे होऊ शकतात. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामनाही येथेच खेळवला जाऊ शकतो. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात यावर्षी आयपीएल सुरु होऊ शकते. यावर्षी आयपीएलची सुरुवात ११ किंवा १४ एप्रिलला होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामना हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. साधारणत: ६ जूनला आयपीएलचा अंतिम सामना होऊ शकतो, असे आता समजत आहे. त्यामुळे यावर्षी भारतामध्येच चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येऊ शकतो. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MnvClg
No comments:
Post a Comment