
चेन्नई, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. यावेळी भारतीय संघांतील खेळाडूंची पहिली करोना चाचणा झाली आहे. आता यापुढे खेळाडूंना काय करावे लागणार आहे, याचा कार्यक्रमही बीसीसीआयने तयार केला आहे. भारतीय खेळाडूंची पहिला करोना चाचणी झाली असून त्यांना आता क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय खेळाडू यावेळी सात दिवस क्वारंटाइनमध्ये असतील. या कालावधीमध्ये खेळाडूंच्या अजून दोन करोना चाचण्या होणार आहेत. या दोन करोना चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यावर खेळाडूंना सामना खेळता येणार आहे. भारतीय खेळाडू सात दिवसांसाठी क्वारंटाइन असले तरी त्यांना सराव आणि व्यायाम करावाच लागणार आहे. भारतीय संघातील सहाय्यक प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना व्हिडीओद्वारे व्यायामाचे प्रकार सांगणार आहेत, त्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंना व्यायाम करावा लागणार आहे. या सात दिवसांच्या क्वारंटाइननंतर सर्व खेळाडू मैदानात एकत्रितपणे सराव करू शकतात. त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची रणनिती ठरवण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला तरी भारतीय खेळाडूंच्या अन्य दोन करोना चाचण्यांचे अहवाल नेमके काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ बुधवारी दाखल झाला. इंग्लंडच्या संघातील सर्व व्यक्तींची यावेळी करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतरच इंग्लंडच्या संघाला हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता सात दिवस इंग्लंडच्या संघाला क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला फक्त तीन दिवसच सराव करण्यासाठी मिळणार आहेत. अजिंक्य रहाणेकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुवर्णसंधी आहे. कारण या मालिकेत अजिंक्य बरेच विक्रम मोडू शकतो, हे आता समोर आले आहे. मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जर अजिंक्यने अशीच कामगिरी केली तर त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, पॉली उम्रीगर, गुंडप्पा विश्वनाथ आणि मुरली विजय यांचे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YmsuZo
No comments:
Post a Comment