अहमदाबाद: कर्णधार केदार देवधर (Kedar Devdhar) आणि कार्तिक ककाडे (Kartik Kakade) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बडोदा संघाने () च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये त्यांनी पंजाबचा २५ धावांनी पराभव () केला. आता अंतिम सामन्यात त्यांची लढत तामिळनाडू विरुद्ध होईल. वाचा- बडोदाचा सलामीवीर केदार देवधरने ४९ चेंडूत चार चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावा केल्या. तर कार्तिकने नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. ज्याच्या जोरावर बडोदाने २० षटकात ३ बाद १६० ही आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. वाचा- कार्तिकने ४१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. कार्तिक आणि देवधर यांच्या फलंदाजीमुळे बडोदाने अखेरच्या ८ षटकात ८५ धावा केल्या. त्यानंतर बडोदाच्या लुकमान मेरिवाल (३ विकेट) आणि निनाद राथवा (२ विकेट)यांनी पंजाबला १३५ धावात रोखले आणि विजय साकारला. वाचा- ... वाचा- पंजाबकडून कर्णधार मनदीप सिंगने नाबाद ४२ धावा केल्या. गुरुकीरत सिंगने ३९ धावांचे योगदान दिले. पंजाबची सुरूवात खराब झाली. २१ धावांवर त्यांचे दोन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर १४ षटकात ४ बाद ७० अशी अवस्था होती. पंजाबला ५ षटाकत विजयासाठी ७० धावा हव्या होत्या. पण धावा करण्यात अपयशी ठरले. याआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये तामिळनाडूने राजस्थानचा सात विकेटनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. वाचा- मुश्ताक अली ट्रॉफीची अंतिम लढत ३१ जानेवारी रोजी होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MHuZ5O
No comments:
Post a Comment