मुंबई: भारतीय क्रिकेट संघ ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ बुधवारी २७ जानेवारी रोजी चेन्नईत दाखल झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी बायो बबलमध्ये प्रवेश केला असून त्यांचा क्वारंटाइन कालावधी सुरू झालाय. वाचा- काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा विजय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणार आहे. या मालिकेसाठी खेळाडू क्वारंटाइन झाले आहेत. क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी मुली सोबत खेळताना दिसला. रहाणेचा हा व्हिडिओ त्याची पत्नी राधिकाने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा शेअर करताना क्वारंटाइनध्ये माझे मनोरंजन, असे राधिकाने म्हटलय. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य उपकर्णधाराच्या भूमिकेत आहे. या मालिकेत भाारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली पुन्हा संघात परतला आहे.ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर त्याने सुट्टी घेतली होती. भारतीय संघातील खेळाडू बुधवारपासून चेन्नईत दाखल होण्यास सुरूवात झाली. मोहम्मद सिराज आणि चेतेश्वर पुजार यांनी सोशल मीडियावरुन त्याची माहिती दिली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात हार्दिक पंड्या आणि जलद गोलंदाज इशांत शर्मा यांचा समावेश झाला आहे. दोन्ही संघातील चार पैकी पहिल्या दोन कसोटी चेन्नईत तर अखेरच्या दोन अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर खेळवल्या जाणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oub6fU
No comments:
Post a Comment