नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेनेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या यशानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून चर्चा सुरू झाली आहे. फक्त क्रिकेट चाहते नाही तर माजी खेळाडूंनी देखील अजिंक्यला कसोटीचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. तर काहींच्या मते रोहीत शर्माला टी-२० संघाचा, विराटला वनडे तर अजिंक्यला कसोटी अशी विभागणी करण्याची मागणी केली आहे. वाचा- भारतीय संघाने विराट कोहली()च्या नेतृत्वाखाली तीनही प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. आता ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. वाचा- विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अद्याप आयसीसीचे एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. टीम इंडियाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ साली चॅम्पियनस ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१ साली भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवता आले नाही. तर २०१९ चा वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद हुकले. वाचा- दोन वर्षात दोन वर्ल्डकप भारतात या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी देखील भारतात होईल. भारतीय संघाला विजेतेपद मिळून देऊन विराट कोहलीला नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉटी पनेसर याच्या मते, जर विराटने आयसीसीच्या आगामी दोन वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळून दिले नाही तर त्याने कर्धारपदाचा राजीनामा द्यावा. वाचा- एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पनेसर म्हणाला, भारताने त्याच्या देशात होणाऱ्या टी-२० किंवा वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले नाही तर मला वाटते की विराटने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा. वाचा- अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रलियाचा २-१ने पराभव केला. हा एक चर्चेचा विषय आहे की, अजिंक्य आणि रोहित यांना जेव्हा जेव्हा संधी दिली त्यांनी शानदार नेतृत्व केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mk8QdD
No comments:
Post a Comment