नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंचा फिटनेस सर्वांनीच पाहिला. भारताचे खेळाडू एकामागून एक दुखापतग्रस्त होत गेले. त्यामुळेच आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता एक नवीन फिटनेस टेस्ट आणली आहे आणि ही टेस्ट पास केल्याशिवाय भारतीय खेळाडूंना संघात प्रवेश दिला जाणार नाही. बीसीसीआयने नवीन कोणती फिटनेस टेस्ट आणली आहे, पाहा...बीसीसीआयने यावेळी टाइम ट्रायल टेस्ट ही नवीन फिटनेस चाचणी आणली आहे. बीसीसीआयने ज्या खेळाडूंबरोबर करार केला आहे, त्या सर्व खेळाडूंना ही टेस्ट पास करणे बंधनकारक आहे. जोपर्यंत ही टेस्ट खेळाडू पास करत नाही, तोपर्यंत खेळाडूला संघात प्रवेश दिला जाणार नाही. टाइम ट्रायल टेस्टमध्ये नेमकं काय असणार आहे...भारतीय खेळाडूंसाठी सध्या यो-यो टेस्ट आहे. पण यो-यो टेस्टबरोबरच भारतीय खेळाडूंना आता टाइम ट्रायल टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये खेळाडूंना सलग दोन किलोमीटर पळावे लागणार आहे. हे दोन किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण करायेच, याचा अवधीही यावेळी बीसीसीआयने सांगितलेला आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसाठी वेगळा अवधी टाइम ट्रायल टेस्ट पूर्ण करण्यासाठी वेगवान आणि फिरकी या दोन्ही गोलंदाजांना वेगवेगळा अवधी देण्यात आल्याचे समजते आहे. वेगवान गोलंदाजांना दोन किलोमीटर हे अंतर ८ मिनिट आणि १५ सेकंदांमध्ये पूर्ण करायचे आहे, तर फिरकी गोलंदाज आणि यष्टीरक्षकांना हे अंतर ८ मिनिटे आणि ३० सेकंदांमध्ये पूर्ण करायचे आहे. जर खेळाडूंनी या अवधीमध्ये हे अंतर पूर्ण केले नाही तर त्यांची निवड भारतीय संघात होऊ शकणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी एका इंग्रजी वर्तमानपत्राला सांगितले की, " भारतीय संघातील खेळाडूंचा फिटनेस वाढायला हवा, यासाठी ही नवीन फिटनेस टेस्ट आणण्यात आली आहे. या फिटनेस टेस्टमुळे नक्कीच खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर फरक पडेल, त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंच्या फिटनेसचा स्तर हा उंचावला जाईल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sMM92K
No comments:
Post a Comment