Ads

Friday, January 29, 2021

तेव्हा लोकलमध्ये कोणी ओळखले नव्हते; आता टीम इंडियाचा स्टार झालाय हा खेळाडू

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात धमाकेदार कामगिरी करून () स्टार झाला. भारतीय संघाच्या विजयाचा मुख्य नायक म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. मायदेशात परतल्यानंतर शार्दुलचे जोरदार स्वागत झाले. चाहते त्याला भेटण्यासाठी आतुर झालेले दिसतात. पण तीन वर्षापूर्वी जेव्हा तो पहिल्या दौऱ्यातून घरी येत होता तेव्हा त्याला कोणी ओळखले देखील नव्हते. वाचा- शार्दुलने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन कसोटी खेळण्याआधी एकच कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात देखील १० चेंडू टाकल्यानंतर त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर झाला. ब्रिस्बेन कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली. मायदेशात आल्यावर शार्दुलचे विमानतळावर आणि नंतर घरी जोरदार स्वागत झाले. पण २०१८ साली जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून मुंबईत परतला होता. तेव्हा त्याने अंधेरीतून पालघरला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडली होती. प्रवाशांनी भरलेल्या त्या लोकल रेल्वेत भारताच्या या स्टार गोलंदाजाला एकानेही ओळखले नाही. वाचा- एका मुलाखतीत शार्दुल म्हणाला, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर मी घरी पालघरला जाण्यासाठी अंधेरीतून लोकल पकडली. मी हेडफोन लावला होता आणि घरी लवकर जाण्यासाठी लोकल पकडली होती. जे लोक मला पाहत होते ते विचार करत होते की मी खरच शार्दुल ठाकूर आहे की नाही. लोकलमधील काही कॉलेजच्या मुलांनी माझा फोटो गुगलवर सर्च केला आणि मीच शार्दुल ठाकूर निश्चित केले. त्यानंतर त्यांनी सेल्फीसाठी विचारले. मी त्यांना पालघरला पोहोचल्यानंतर सेल्फी घेऊ असे म्हटले. माझ्या सोबत प्रवास करणाऱ्या अनेकांना आश्चर्य वाटत होते की ते भारतीय क्रिकेटपटू सोबत प्रवास करत आहेत. वाचा- शार्दुल आणि मुंबईच्या लोकल रेल्वेचा खुप जवळचे नाते आहे. तो रोज सकाळी पाचची लोकल गाडी पकडून बोरिवलीला जात असे, जेणेकरून शाळेकडून क्रिकेट खेळू शकले. यामुळेच त्याला पालघर एक्स्प्रेस असे नाव पडले. रोजचा ३ तासाच्या प्रवासाने शार्दुलला मानसिकदृट्या मजबूत केले. ब्रिस्बेन कसोटीत शार्दुलने ७ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ६७ धावा केल्या. भारत पहिल्या डावात ६ बाद १८६ अशा अवस्थेत असताना त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KZBG2X

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...