नवी दिल्ली: Marriage भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू लग्नाच्या बंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरनसह सात फेरे घेतले. या दोघांनी आयपीएलच्या १३व्या हंगामाआधी साखरपुडा केला होता आणि सोशल मीडियावरून ही गुड न्यूज दिली होती. वाचा- विजय शंकरने २६ जानेवारी रोजी त्याचा ३०वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना ही लग्नाची बातमी दिली. आयपीएलमधील त्याचा संघ सनरायजर्स हैदराबादने त्याला शुभेच्छा दिल्या. वाचा- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूकडून २०२१ साली मिळालेली ही दुसरी गुड न्यूज आहे. याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. विजय शंकरच्या आयुष्यातील या नव्या डावासाठी संघातील अन्य खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, क्रुणाल पंड्या, करुण नायर, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल आणि अभिन मुकुंद यांनी शंकरला शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजय शंकरला स्थान मिळू शकले नव्हते. शंकरने २०१८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला होता. इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. तेव्हा शंकरला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याला फार खास कामगिरी करता आली नाही. दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. नंतर त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली गेली. वर्ल्डकपनंतर भारतीय संघात त्याला संधी मिळू शकले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L06el8
No comments:
Post a Comment