नवी दिल्ली, : भारतीय चाहत्यांसाठी काही दिवसांत एक आनंदाची बातमी येऊ शकते. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळू शकते. यासाठी बीसीसीआय सध्याच्या घडीला सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्यानंतर मार्च महिन्यात भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेत भारतीय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. पण मार्च महिन्यामध्ये भारताची ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. अहमदाबादमध्ये १२ मार्चपासून ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. पण यामध्ये एक समस्या असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण ही अडचण दूर होऊन चाहत्यांना यावेळी एक सरप्राइज गिफ्ट मिळेल, अशी आशा सर्वांनाच आहे. काय आहे बीसीसीआयपुढे मोठी अडचण...याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, " भारत आणि इंग्लंड यांच्यामधील ट्वेन्टी-२० मालिकेपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात यावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. स्टेडियममध्ये किती प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा, याबाबतही बीसीसीआय विचार करत आहे. पण यासाठी बीसीसीआयला सरकारच्या परवानगीची गरज आहे. सरकारच्या परवानगीशिवाय बीसीसीआयला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे सरकारने जर परवानगी दिली तर चाहत्यांसाठी आम्ही प्रवेश खुला करू शकतो." सरकारने परवानगी दिल्यावर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. पण करोनाचे वातावरण पाहता यावेळी फक्त स्टेडियमच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे आता सरकारच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता बीसीसीआयने भारत आणि इंग्लंड मालिकेत खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करता कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. खबरदारी म्हणून पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sUoj4Y
No comments:
Post a Comment