ब्रिस्बेन, : भारतीय खेळाडूंवर सिडनी आणि ब्रिस्बेन येथील मैदानात प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केली होती. या प्रकरणाची चौकशी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत होती. ही चौकशी आता पूर्ण झाली असल्याचे समजते आहे. या चौकशीमधून बऱ्याच गोष्टी आता समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याप्रकरणी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने मैदानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंवर कीती जणं वर्षद्वेषी टीका करत होते, हेदेखील यामध्ये आता समोर आलेले आहे. यामध्ये दोषी ठरलेल्या प्रेक्षकांना न्यू साऊथ वेल्स येथील पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. काही दिवसांतच न्यू साऊथ वेल्स येथील पोलिस आपला अहवाल सादर करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष सीन कॅरोल यांनी यावेळी सांगितले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघातील खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ चौकशीनंतर स्पष्ट करु इच्छिते की, सिडनीमध्ये भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. आता या प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने अजून काही गोष्टींची चौकशी करण्याचे ठरवले आहे." सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांना प्रेक्षकांनी शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर यावेळी त्यांच्यावर वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघाने याबाबतची तक्रार मैदानातील पंचांकडे केली होती. त्यावेळी मैदानातील पंचांनी भारतीय संघाला मैदान सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. पण यावेळी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ही गोष्ट मान्य केली नव्हती. क्रिकेट या खेळाचा आम्ही सन्मान करतो आणि त्यामुळे आम्ही मैदान सोडून जाणा नाही, अशी भूमिका यावेळी अजिंक्यने घेतलेली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर आयसीसीदेखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या प्रेक्षकांवर आता कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेल आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cg4RtO
No comments:
Post a Comment