कोलकाता : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांना आज तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण या एकाच महिन्यात गांगुली यांना दुसऱ्यांदा हॉस्पिटलची पायरी चढावी लागली आहे. महिन्याभरात गांगुली यांना नेमकं काय झालं आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती... गांगुली यांना काल अस्वस्थ वाटू लागले होते, त्याचबरोबर त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे आज सोमवारी त्यांना तातडीने कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. गांगुली यांच्यावर यापूर्वी १ जानेवारीलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. त्यावेळी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यानंतर मात्र गांगुली यांच्या तब्येतीमध्ये काही काळ सुधारणार दिसली होती. पण त्यानंतर काही दिवसांतच गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर गांगुली यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यावेळी गांगुली यांना तात्काळ वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांमध्ये गांगुली यांना वुडलँड्स हॉस्पिटलमधून डीस्चार्जही दिला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. वुडलँड्स हॉस्पिटलमधून घरी आल्यावर गांगुली काही दिवसांनंतर पूर्णपणे फिट असल्याचे दिसत होते. बीसीसीआय आणि आयपीएलच्या काही बैठकांमध्येही त्यांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. पण पुन्हा एकदा २७ जानेवारीला गांगुली यांच्या छातीत पुन्हा दुखायला लागले आणि त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गांगुली यांना नेमके काय झाले आहे, याचे निदान अद्याप झालेले नाही. पण त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मात्र सुरु करण्यात आले आहेत. काही वेळात अपोलो हॉस्पिटलमधून मेडिकल बुलेटिन सादर करण्यात येईल आणि त्यानंतरच गांगुली यांना यावेळी नेमकं काय झालं आहे, हे सर्वांना समजू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NAmB8J
No comments:
Post a Comment