लंडन: इंग्लंडचे माजी सलामीचे फलंदाज () यांनी संघाचा विद्यमान कर्णधार जो रूट () संदर्भात एक मोठे विधान केले आहे. भारताचा माजी फलंदाज ()चा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता रुटमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा- इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात रुटने चार डावात १०६.५०च्या सरासरीने ४२६ धावा केल्या. २२८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती आणि इंग्लंडने मालिका २-०ने जिंकली. वाचा- पुढील महिन्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच फेब्रुवारीपासून कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. रुट सध्या इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर कसोटीत दोन द्विशतक करणारा तो पहिला कर्णधार आहे. वाचा- 'द टेलीग्राफ'मधील लेखात बॉयकॉट लिहितात, डेव्हिड गॉवर, केव्हीन पिटरसन आणि माझ्यापेक्षा अधिक धावा करण्याचे तर सोडाच. पण जो रूटमध्ये २०० कसोटी सामने खेळून सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा मोडण्याची क्षमता आहे. रुट आता ३० वर्षाचा आहे आणि त्याने ९९ कसोटीत ८ हजार २४९ धावा केल्या आहेत. जर त्याला गंभीर दुखापत झाली नाही. तर तो सचिनच्या १५ हजार ९२१ धावांचा विक्रम मोडू शकतो, असे ते म्हणाले. वाचा- रुटची तुलना आधीच्या पिढीतील दिग्गज फलंदाजांची केली जाऊ नये. त्याची कामगिरी सध्याच्या फलंदाजांशी केली जावी. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियमसन हे चांगले फलंदाज आहेत. जे अधिक धावा करत आहेत. आपण रुटच्या फलंदाजीचा आनंद घेतला पाहिजे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c8FABL
No comments:
Post a Comment