Ads

Wednesday, January 20, 2021

IPL 2021च्या आधीच धोनीला बसला मोठा धक्का; या दिग्गज खेळाडूने घेतली माघार

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाला मार्च महिन्यात सुरूवात होणार आहे. याआधी युएईमध्ये झालेल्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. त्यामुळे चेन्नईने नव्याने संघाची बांधणी करण्याचे ठरवले आहे. अशात चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. दिग्गज फिरकीपटू ()ने येणाऱ्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. वाचा- हरभजनने आयपीएल २०२१ च्या हंगामात चेन्नई संघाकडून खेळणार नसल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. त्याने चाहते आणि संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. त्याच बरोबर त्याने टीम सोबतचा काळ शानदार असा होता असे म्हटले आहे. वाचा- आणि हरभजन सिंग यांच्यातील तीन वर्षाचा करार २०२० मध्ये संपला आहे. चेन्नई संघाने २०१८ साली दोन कोटीमध्ये खरेदी केली होते. हा करार ३ वर्षाचा होता. पण गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या हंगामात त्याने खेळणार नसल्याचे म्हटले होते. वाचा- हरभजनने २०१९ साली संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण तेव्हा मुंबईकडून चेन्नईचा १ धावांने पराभव झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये तो खेळला नाही. सीएसके सोबतचा माझा करार संपला आहे. या संघासोबत खळण्याचा माझा अनुभव शानदार होता. येणारे अनेक वर्ष हा अनुभव मला लक्षात राहिल. संघ व्यवस्थापन, स्टाफ आणि चाहते या सर्वांचे मी आभार मानतो, ऑल द बेस्ट! वाचा- वाचा- IPL २०२१ साठी आठ ही संघांसाठी खेळाडू रिटेन करण्याचे आणि रिलिझ करण्याची अखेरची तारीख २० जानेवारी ठेवण्यात आली आहे. २०२० च्या आयपीएलमध्ये सीएसकेची कामगिरी खराब झाली होती. त्यांना प्रथमच प्ले ऑफमध्ये जागा मिळवता आली नव्हती. त्यामुळेच चेन्नईने काही खेळाडूंना रिलिज करण्याचा निर्णय घेतला होता. त्या शिवाय शेन वॉट्सनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याने त्याची जागा भरावी लागमार आहे. या शिवाय केदार जाधव, पियुष चावला, मुरली विजय सारखे खेळाडू बाहेर होऊ शकतात.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KC8Ghy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...