Ads

Tuesday, January 19, 2021

टिम पेनचा माज उतरला; ऑस्ट्रेलियातील मीडियाने वास्तवाची जाणीव करून दिली

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा कसोटी मालिका सुरू झाली होती तेव्हा जगभरात असे अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू होते ज्यांना वाटत होते की टीम इंडियाचा यावेळी मोठा पराभव होणार. विराट कोहली संघात नाही, अनेक खेलाडू दुखापतीमुळे बाहेर बसले होते. त्यामुळे दिग्गज खेलाडूंनी भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. पण अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात पराभूत केले आणि नवा इतिहास घडवला. वाचा- क्रिकेट हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामुळे भारताविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवाचे पडसाद तेथील प्रसारमाध्यमांमधून उमटले नाही तरच नवल. पाहूयात भारताच्या विजयाबद्दल ऑस्ट्रेलिया मीडिया काय म्हणते... कसोटी मालिकेच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलिया मीडियाचे असे मत होते की भारतीय संघ जिंकू शकत नाही. पण चौथ्या कसोटीसह मालिका विजयानंतर मात्र त्यांनी युटर्न घेतला. ऑस्ट्रेलिया मीडियाने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. टीम इंडियाचा हा सर्वोत्तम विजय ठरला आहे, अशा शब्दात त्यांनी भारतीय संघाच्या विजयाची बातमी दिली आहे. एडिलेडमध्ये ३६ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने मालिका २-१ ने जिंकली या गोष्टीचा ठळकपणे उल्लेख केला आहे. वाचा- टिम पेनचा माज उतरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने सिडनी कसोटीतभारतीय फिरकीपटू आर अश्विनला बाद करण्यासाठी स्लेजिंग केले होते. यावरून सिडनी मॉर्निंग हेराल्डने पेनला फटकारले. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी तो भारतीय संघाला म्हणाला होता की, ब्रिस्बेनमध्ये बघू घेऊ. पण चौथ्या कसोटीत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना काहीच करता आले नाही. पेन यासाठी तसे म्हणाला होता कारण गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षात कधीच पराभव झाला नव्हता. इतक नव्हे तर या मैदानावर आतापर्यंत कधीच आशिया संघाने विजय मिळवाल नाही. पण यावेळी भारतीय संघाने विजय मिळवला आणि टिम पेनचा माज उतरवला, अशा शब्दात हेराल्डने बातमी दिली आहे. वास्तवाची जाणीव करून दिली भारतच्या विजयावर फॉक्सस्पोर्टने म्हटले आहे की, जर तुम्हाला धक्का बसला असेल तर घाबरू नका. तुम्ही एकटे नाही आहात. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. कसोटी क्रिकेटमधील ही भारताचा सर्वात शानदार विजय आहे. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या स्थितीतून बाहेर येत स्वत:ची ताकद दाखवली. आज तर जल्लोष केला पाहिजे आणि पुढील काही दिवस हा जल्लोष झालाच पाहिजे. अन्य एका वृत्तपत्रात म्हटले आहे की, या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला वास्तवाची जाणीव करून दिली आहे. स्टार खेळाडू नाहीत, संघर्ष, दुखापतग्रस्त भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा लाजिरवाणा पराभव केला, असे द ऑस्ट्रेलियनने म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pdJH3f

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...