नवी दिल्ली : एक मोठा खुलासा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात झालेला आहे. भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडनेच भारताच्या गोलंदाजाविरुद्ध खेळण्याच्या टीप्स एका प्रतिस्पर्धी फलंदाजाला दिल्याचे आता पाहायला मिळत आहे. ही गोष्ट २००२ साली घडली होती. जेव्हा एक संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील एका फलंदाजाला भारताचा माजी महान गोलंदाज अनिल कुंबळे याचा सामना करताना अडचण येत होती. त्यावेळी द्रविडने अनिल कुंबळेच्या गोलंदाजीविरुद्ध कशी फलंदाजी करायची, याचा टीप्स दिल्या होत्या. द्रविडने नेमक्या कोणत्या टीप्स दिल्या होत्या, पाहा... याबाबतचा मोठा खुलासा झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ततेंदा तैबूने केला आहे. याबाबत तैबू म्हणाला की, " आम्ही २००२ साली जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आलो होतो, तेव्हा मला कुंबळेची गोलंदाजी चांगल्यापद्धतीने खेळता येत नव्हती. माझ्यासमोर त्यावेळी मोठी अडचण होती की, कुंबळेच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा. त्यावेळी भारताच्या राहुल द्रविडने मला काही टिप्स दिल्या होत्या." याबाबत तैबु पुढे म्हणाला की, " कुंबळेच्या गोलंदाजीचा सामना करताना मध्यमगती गोलंदाज सामना करत आहे, असे समजून तु फलंदाजी कर. पण त्यावेळी बॅट ही पॅडच्या समोर यायला हवी. त्याचबरोबर चेंडूवर अखेरपर्यंत लक्ष ठेवायला हवे. ही गोष्ट जर तु केलिस तर तुला चांगली फलंदाजी करता येऊ शकते. या मालिकेत खेळत असताना मला कुंबळेने चारपैकी तिनवेळा आऊट केले होते. त्यानंतर मी ही गोष्ट द्रविडला सांगितली होती आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना द्रविडने मला हा सल्ला दिला होता." सध्याच्या घडीला ही गोष्ट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने सर्वांसमोर आणली आहे. याबाबतचे एक ट्विट पीटरसनने केले होते. पीटरसनने आपल्या पुस्तकामध्ये हा प्रसंग लिहिला होता. त्यानंतर ही गोष्ट सर्वांपुढे आली होती. पण याबाबत अजूनही द्रविडने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे ही गोष्ट खरंच घडली आहे का, हे द्रविडच्या वक्तव्यानंतरच त्याव शिक्कामोर्तब होऊ शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mry4H6
No comments:
Post a Comment