चिन्नाप्पमपट्टी: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव केला. भारतीय संघातील क्रिकेटपटूंचे त्यांच्या शहरात आणि गावात जोरदार स्वागत केले जात आहे. भारताचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेचे सोसायटीमधील सर्व लोकांनी जंगी स्वागत केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबईच्या अन्य खेळाडूंचे देखील विमानतळावर जोरदार स्वागत झाले. वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका खेळाडूने खास असा विक्रम केला. ( ) याचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. पण दौरा संपल्यानंतर मात्र त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला. भारतीय संघाकडून एकाच दौऱ्यात तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. फक्त पदार्पणामुळे नाही तर नटराजनची कामगिरी देखील शानदार ठरली. वाचा- भारताच्या या गोलंदाजाचे पदार्पण जसे खास ठरले तसेच त्याचे स्वागत देखील अन्य खेळाडूंपेक्षा सर्वात हटके झाले. भारतात पोहोचलेला नटराजन सालेम येथील चिन्नाप्पमपट्टी गावात पोहोचला तेव्हा त्याचे स्वागत असे करण्यात आले जणू तो भारतीय संघाला विजय मिळवून देणारा कर्णधार आहे. वाचा- सालेममध्ये त्याला रथामध्ये बसवण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावरून नटराजनची लोकप्रियता किती वाढली आहे याची कल्पना येते. वाचा- एका छोट्या गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या नटराजनच्या या यशाबद्दल गावातील लोकांना प्रचंड मोठा आनंद झाला होता. सर्व जण नटराजन, नटराजन अशा घोषणा देत होते. त्याच्या स्वागतासाठी उपस्थित चाहते फोटो आणि व्हिडिओ शुट करत होते. गावातील लोकांनी ढोल-ताशात नटराजनला घरापर्यंत सोडले. नटराजनच्या या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील हा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LMJNQV
No comments:
Post a Comment