अहमदाबाद: सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीतील पहिली सेमीफायनल लढत मोटेरा क्रिकेट मैदानावर राजस्थान आणि तामिळनाडू यांच्यात झाली. या महत्त्वाच्या लढतीत तामिळनाडूने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यांनी राजस्थानचा ७ विकेटनी पराभव केला. वाचा- पहिल्या सेमीफायनल लढतीत राजस्थानचा कर्णधार अशोक मेनारियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकात ९ बाद १५४ धावा केल्या. तामिळनाडूला विजयासाठी १५५ धावांची गरज होती. अरुण कार्तिकच्या धमाकेदार फलंदाजीच्या तामिळनाडूने विजयाचे लक्ष्य १८.४ षटकात आणि ३ विकेटच्या मोबदल्यात पार केले. वाचा- अंतिम लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवात खराब झाली. हरी निशांत चार धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसरी विकेट देखील लवकर पडली. एन जगदीशन याने २८ धावा केल्या आणि संघाला स्थिर केले. पण तो देखील मोठी धावसंख्या करू शकला नाही. तिसरी विकेट पडल्यानंतर अरुण फलंदाजीला आला. त्याने नाबाद ८९ धावांची धमाकेदार फलंदाजी केली आणि विजय मिळवून दिला. तर कर्णधार दिनेश कार्तिकने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. वाचा- वाचा- अरुण कार्तिकने ५४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १६४.८१च्या स्ट्राइक रेटने नाबाद ८९ धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार अशोक मेनारियाने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो ५१ धावांवर बाद झाला. राजस्थानकडून अर्जित गुप्ताने ४५ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L3CYdg
No comments:
Post a Comment