![](https://maharashtratimes.com/photo/80603231/photo-80603231.jpg)
कराची: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने शानदार कामगिरी करत आफ्रिकेचा सात विकेटनी पराभव करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाककडून फवाद आलमने केलेल्या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना ४ फेब्रुवारीपासून रावळपिंडी येथे होणार आहे. वाचा- दोन्ही संघातील पहिल्या कसोटी सामन्यात एक घडना घडली ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावात () आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ( ) यांच्यात वाद झाला. या दोघातील वाद मिटवण्यासाठी मैदानातील अंपायरला यावे लागले. वाचा- पाकिस्तानच्या पहिल्या डावात १०५ षटक केशव महाराज टाकत होता. हसनच्या षटकातील एक चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न अलीने केला. पण चेंडू विकेटला लागला. ज्यावर गोलंदाज आणि विकेटकिपर डिकॉकने आउटसाठीची अपील केली. पण तो चेंडू नो बॉल होता. ज्यावरून हसन अली आणि डीकॉक यांच्यात वाद सुरू झाला. वाचा- वाचा- दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हसन अलीला बाद न दिल्याने निराश झाले. त्यानंतर हसन काही शब्द डीकॉकला बोलला त्यावरुन तो भडकला. दोघांच्या काही शाब्दिक वाद सुरू झाल्यावर दोन्ही अंपायर त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी वाद मिटवला. वाचा- पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२० धावात संपुष्ठात आला. पाकिस्तानने उत्तरादाखल ३७८ धावा केल्या. फवाद आलम शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेला फक्त २४५ धावा करता आल्या. पाकिस्तानला विजयासाठी ९० धावांचे आव्हान होते. त्यांनी ३ विकेटच्या बदल्यात ते पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतील. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t97sf5
No comments:
Post a Comment