नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाने इतिहास रचला. भारताचे एकामागून एक खेळाडू दुखापत ग्रस्त होत होते. पण भारताने एका खेळाडूला कधीच कसोटी सामन्यात उतरवले नाही. पण आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये मात्र या खेळाडूला संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा जवळपास एक संघच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे कोणाला खेळवायचे हा प्रश्न भारतीय संघापुढे होता. पण भारतीय संघाने या खेळाडूला एकदाही संधी दिली नाही. पण आता हाच खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्णायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. हा खेळाडू आहे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी कुलदीपला भारतीय संघात स्थान मिळेल, असे म्हटले जात होते. पण त्यावेळी भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिले आणि कुलदीपला संधी मिळू शकली नाही. पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप निर्णायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण चेन्नईची खेळपट्टीही फिरकीला मदत करणारी असेल, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप हा निर्णायक ठरू शकतो, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्यानंतर मार्च महिन्यात भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेत भारतीय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. पण मार्च महिन्यामध्ये भारताची ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. अहमदाबादमध्ये १२ मार्चपासून भारत आणि इंग्ंलंड यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यावा, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. पण यामध्ये एक समस्या असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण ही अडचण दूर होऊन चाहत्यांना यावेळी एक सरप्राइज गिफ्ट मिळेल, अशी आशा सर्वांनाच आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3657L0E
No comments:
Post a Comment