मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ने जिंकली. विराट कोहलीसह अन्य महत्त्वाचे खेळाडू संघात नसताना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडवला. या ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या संघात महाराष्ट्रातील चार खेळाडू होते. अशा चार आणि टी-२० मालिकेतील एका खेळाडूसह पाच जणांचा नागरी सत्कार करू,असे आश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला () दिले. वाचा- भारतीय कसोटी संघाचा कर्णधार (), उपकर्णधार , , पृथ्वी शॉ आणि टी-२० मालिकेतील खेळाडू श्रेय्यस अय्यर यांना राज्य सरकारकडून नागरी सत्कार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, वैभव शिंदे व सिध्देश नाक्ती यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन केली. वाचा- या क्रिकेटपटूंचे मुंबई विमानतळावर राज्य सरकारच्यावतीने स्वागत करण्याची योजना होती. पण कोविडच्या मार्गदर्शक तत्वामुळे विमानतळावर आम्ही उपस्थित राहिलो नाहीत. पण या खेळाडूंचा निश्चितपणे राज्य सरकारच्यावतीने जाहिर सत्कार केला जाईल,असे आश्वासन सुनील केदार यांनी मनसेच्या या शिष्टमंडळाला दिले. वाचा- संपूर्ण क्रिकेट विश्वात या विजयाचे कौतुक होत आहे. या विजयात मोलाचा वाटा उचलणा-या राज्यातील या खेळाडूंचा नागरी सत्कार केल्यास देशातील युवकांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन भविष्यात भारताचे नाव क्रीडा क्षेत्रात नक्कीच उंचावेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2McQeg7
No comments:
Post a Comment