नवी दिल्ली, : ब्रिस्बेन कसोटीनंतर भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला एक खास नाव देण्यात आले होते. यावेळी शार्दुलची तुलना भारताच्या एका महान फलंदाजाबरोबर करण्यात आल्याचा मोठा खुलासा आता करण्यात आला आहे. ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघ अचडणीत सापडला होता. त्यावेळी शार्दुलने अर्धशतक झळकावत संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्याचबरोबर शार्दुलने यावेळी वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२३ धावांची दमदार भागीदारीही रचली होती. या भागीदारीमुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला होता, असे काही जणांनी म्हटले होते. या सामन्यातील शार्दुलची फलंदाजी पाहून भारतीय संघातील काही सदस्य त्याच्या प्रेमात पडले होते. शार्दुलची फलंदाजी ही पाहून भारतीय संघातील काही व्यक्तींना भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आठवण आली होती. शार्दुलचे काही फटके हे सचिनसारखे होते, असे भारतीय संघातील काही व्यक्तींना वाटत होते. त्यामुळे त्यांनी या सामन्यानंतर शार्दुलला एक टोपण नाव दिले. या सामन्यानंतर त्याला शार्दुलकर अशा टोपण नावाने बोलवले जाऊ लागले आहे. भारतीय संघातील सहाय्यक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी आता हा खुलासा केला आहे. याबाबत श्रीधर यांनी सांगितले की, " ब्रिस्बेन कसोटीमध्ये शार्दुलने फलंदाजीमध्ये कमाल केली. शार्दुल ज्यापद्धतीने फटकेबाजी करत होता ते पाहून आम्हाला सचिन तेंडुलकरची आठवण आल्यावाचून राहिली नाही. सचिन आणि शार्दुल हे दोघेही मुंबईचे आहेत. त्यामुळे तेंडुलकरनंतर शार्दुलकर तयार झाला आहे, असे काही जणांचे म्हणणे होते. त्यामुळे आम्ही शार्दुलला हे नवीन नाव दिले." ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाने इतिहास रचला. भारताचे एकामागून एक खेळाडू दुखापत ग्रस्त होत होते. पण भारतीय संघाने यावेळी हार मानली नाही. भारताच्या संघात ज्या युवा खेळाडूंना संधी दिली होती, त्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत भारताच्या कामगिरीचा स्तर उंचावला. त्यामुळेच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवता आला. त्यामुळे या दमदार विजयानंतर भारताच्या विजयाचे श्रेय बऱ्याच जणांनी संघातील युवा खेळाडूंनाही दिले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iF5I8m
No comments:
Post a Comment