मुंबई : महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. पण तरीही धोनीची जादू अजूनही संपलेली पाहायला मिळत नाही. कारण आंतरराष्ट्रीय परिषदेनेही निवृत्तीनंतर धोनीची दखल घेतली असून त्याला आता मानाचे पान मिळाले आहे. धोनी हा आपल्या कुशल नेतृत्वामुळे क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होता. पण निवृत्तीनंतरही चाहते धोनीला अजूनही विसरु शकलेले नाहीत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि आयसीसीनेदेखील धोनीचा यावेळी सन्मान केल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर काल एक प्रश्न विचारला होता आणि चाहत्यांकडून याबाबत आपली मते मागवली होती. यामध्ये आयसीसीने विचारले होते की, " क्रिकेट विश्वातील सर्वात शांत खेळाडू तुम्हाला कोण वाटतो?" यासाठी आयसीसीने चार पर्यायही दिले होते. यामध्ये धोनीसह केन विल्यम्सन, मिसबाह उल हक आणि स्टीव्ह वॉ असे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर चाहत्यांनी तब्बल ७१.५ टक्के मतं ही धोनीला दिली आहेत. त्यामुळे धोनी यामध्ये एकहाती विजयी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीनंतर सर्वाधिक मतं ही केनला मिळाली. केनला यावेळी १६.८ टक्के एवढी मतं मिळाली, पण ही मतांची टक्केवारी धोनीपेक्षा तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे या स्पर्धेत धोनीने एकहाती विजय मिळवला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चाहते अजूनही धोनीवर तितकेच प्रेम करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे धोनीची क्रिकेट चाहत्यांवरील जादू अजूनही संपलेली नाही. धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनी क्रिकेट विश्वात जसा आपल्या नेतृत्वामुळे प्रसिद्ध आहे, तसाच तो आपल्या नवीन लुकसाठीही असतो. गेल्या वर्षभारता धोनीचे बरेच लुक पाहायला मिळाले. पण धोनीचा सध्याचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच धोनीच्या नव्या लुकचे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या नवीन लुकमध्ये धोनी अजून तरुण दिसत आहे. अशी प्रतिक्रीया काही चाहत्यांनीही दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mt6N7g
No comments:
Post a Comment