मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशात परतले आहेत. कसोटी मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात ()ने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात ६७ धावा तर दोन्ही डावात मिळून सात विकेट घेतल्या होत्या. वाचा- पालघरमध्ये घरी पोहोचल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शार्दुल म्हणाला, गाबामध्ये ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय हा खास होता. आमचा संघ युवा होता. पण सर्वांनी १०० टक्के कामगिरी केली. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सर्वांनी योगदान दिले. हा एक सामूहिक प्रयत्न होता. ब्रिस्बेन कसोटीत आम्ही विजयासाठी उतरलो होतो. वाचा- वाचा- चौथ्या कसोटी ऑस्टेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. भारतीय संघा समोर एक विशाल लक्ष्य होते आणि संघाची अवस्था ६ बाद १८६ अशी होती. अशा अवघड परिस्थितीत शार्दुलने पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर सोबत सातव्या विकेटसाठी १२३ धावांची महत्त्वाची भागिदारी केली. त्यामुळे भारताला ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. वाचा- वाचा- मी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर येत होतो. तेव्हा फलंदाजीचे कोच विक्रम राठोड माझ्या जवळ आले आणि म्हणाले, बॉलच्या मेरिटनुसार खेळ. खराब शॉर्ट खेळू नको. मैदानावर आल्यावर सुंदरला सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज थकले आहेत. त्यांनी संपूर्ण मालिकेत एकाही जलद गोलंदाजाला विश्रांती दिली नव्हती. त्यामुळे थकने स्वाभाविक आहे. आम्ही फक्त नैसर्गिक खेळ केला. वाचा- वाचा- आम्ही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा निर्भयपणे सामना केला. दोन तास गोलंदाजी केल्यावर हा विश्वास आला की मी सर्व प्रकारचे शॉर्ट खेळू शकतो. मी जलद गोलंदाजीवर फलंदाजीचा आनंद घेतला. वेगाला घाबरलो नाही. मी गावी उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी केली आहे. त्याचा फायदा झाल्याचे शार्दुलने सांगितले. वाचा- शार्दुलने कसोटी करिअरची सुरुवात २०१८ साली केली होती. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुखापतीमुळे तो बाहेर झाला होता. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o4TAPe
No comments:
Post a Comment