नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा विजय होईल अशी भविष्यवाणी इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने केली आहे. दोन्ही संघातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत होणार आहेत. गेल्या वेळी म्हणजेच २०१६ साली जेव्हा चेन्नईत दोन्ही संघा दरम्यान कसोटी सामना झाला होता तेव्हा इंग्लंडचा ७५ धावांनी पराभव झाला होता. या दोन्ही संघात चेन्नईत ९ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी ५ भारताने तर ३ इंग्लंडने जिंकलेत. तर १९८२ साली झालेला सामना ड्रॉ झाला होता. वाचा- इंग्लंडचा माजी फिरकीपटू ()च्या मते इंग्लंडविरुद्धची आगामी कसोटी मालिका भारत विजय मिळवू शकतो. कारण ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. मला वाटत नाही की इंग्लंडचा वाइटवॉश होईल. पण भारत मजबूत आहे आणि त्याला विजयाची संधी अधिक आहे. वाचा- इंग्लंडने २०१२-१३ साली अखेरची कसोटी मालिका भारतात जिंकली होती. तेव्हा पनेसर इंग्लंडकडून खेळत होता. त्याने ३ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडकडे मजबूत जलद गोलंदाज आहेत. पण त्यांची फलंदाजी कमकूवत आहे. फिरकी गोलंदाजांना ते लवकर बाद होतात. भारत यावर अधिक भर देईल. त्यांनी मालिका ४-०ने जिंकली तर मोठा धक्का असेल. पण माझ्या मते मालिका २-१ किंवा २-० अशी होईल. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मालिका २-० अशी जिंकली. भारतीय संघाचा परदेशातील हा सर्वात खास विजय आहे, असे पनेसर म्हणाला. संघाचे कोच रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटीत ३६ वर बाद झाल्यानंतर संघाला सकारात्मकतेने मार्गदर्शन केले. वाचा- भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्याची सुरूवात सौरव गांगुलीने केली होती. त्याचा व्यवस्थापनात सहभाग झाल्याने मोठे बदल झाले आहेत. इंग्लंड संघातील खेळाडू फिरकीपेक्षा जलद गोलंदाजांना अधिक चांगल्या पद्धतीने खेळतात. केव्हिन पीटरसन प्रमाणे अन्य खेळाडू फिरकीपटूंच्या विरुद्ध चांगली फलंदाजी करू शकत नाहीत, असे तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r2GKTv
No comments:
Post a Comment