नवी दिल्ली, : क्रिकेट विश्वाला सध्याच्या घडीला उत्सुकता आहे ती यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावाची. यावर्षी आता आयपीएलचा लिलाव नेमका कधी होणार, याबाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे आता समोर आले आहे. यावर्षी कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील हे सर्वांना १८ फेब्रुवारीला समजू शकते. कारण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला खास माहिती दिली आहे. यामध्ये या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होऊ शकतो. पण याबाबतचे ठिकाण मात्र येत्या काही दिवसांमध्ये निश्चित करण्यात येणार आहे." सध्याच्या घडीला आयपीएल सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स या संघाने हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय, केदार जाधव, मोनू सिंग या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्सच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये बरेच नामांकित खेळाडू पाहायला मिळतील. पण या नामांकित खेळाडूंना नेमक्या कोणत्या संघात स्थान मिळते, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. गेल्यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण यावर्षी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. यावर्षी आयपीएल एप्रिल महिन्यात होऊ शकते, असे समजते आहे. त्यामुळे त्यापूर्वी आयपीएलचा लिलाव होणार आहे. या लिलावात कोणते संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतात, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आयपीएलच्या लिलावाकडे लागलेले आहे. त्यामुळे आता १८ फेब्रुवारीला लिलाव होतो का आणि त्यामध्ये कोणत्या खेळाडूला किती भाव मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pctESY
No comments:
Post a Comment