नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताचे खेळाडू एकामागून एक दुखापतग्रस्त होत होते. सामना खेळत असतानाही काही खेळाडूंना गंभीर दुखापत झाली होती. पण त्यांनी मैदान सोडले नाही आणि ते भारतासाठी लढतच राहीले. पण या क्रिकेटपटूंच्या घरच्यांवर नेमकी काय परिस्थिती ओढावली असेल, याचा अंदाज सर्वांना येऊ शकतो. कारण आता आपल्या बाबांना फलंदाजी करताना जिथे-जिथे चेंडू लागला आहे, तिथे या क्रिकेटपटूची मुलगी पापी देऊन त्याची वेदना कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. पण या सामन्यात दमदार फलंदाजी केली ती चेतेश्वर पुजाराने. या सामन्यात फलंदाजी करत असताना बऱ्याचदा पुजाराच्या अंगावर चेंडू आदळले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. पुजाराने त्यावेळी मैदान सोडले नाही आणि तो खेळतच राहीला. पण यानंतर आता पुजाराला घरी आल्यावर एक छान गिफ्ट मिळणार आहे. पुजाराची मुलगी अदिती यावेळी म्हणाली की, " जेव्हा बाबा घरी येतील तेव्हा त्यांना जिथे-जिथे चेंडू लागला आहे तिथे-तिथे मी त्यांना पापी देणार आहे. यामुळे त्यांची दुखापत कमी होईल." मुलांवर जसे संस्कार केले जातात, तशीच ती वागत असतात. पुजाराच्या मुलीच्याबाबतीतही हीच गोष्ट पाहायला मिळाली आहे. याबाबत पुजाराने सांगितले की, " जी गोष्ट मी अदितीबरोबर करतो तीच ती माझ्याबरोबरही करणार आहे. खेळत असताना अदिती जेव्हा पडते आणि तिला जिथे लागते तिथे मी तिला पापी देतो आणि सांगतो की, ही दुखापत लवकरच बरी होईल. त्यामुळे तिला विश्वास आहे की, मला झालेल्या दुखापतीही अशाच भरून निघू शकतील." चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ रडीचा डाव खेळत असला तरी भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा चांगलाच लढला. पुजाराच्या अंगावर चेंडू टाकून त्याला घाबरवण्याचे काम यावेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज करत होते. पण पुजारा या सर्व गोष्टींना घाबरला नाही आणि आपले अर्धशतक साकारत त्याने कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची तोंडं बंद केली. एकदा तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टाकलेला बाऊन्सर पुजाराच्या डोक्यावर आदळला, पण तरीही पुजाराने यावेळी मैदान सोडले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qzMCTO
No comments:
Post a Comment