नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले. भारतीय संघाच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला देखील जोरदार धक्क बसला. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्याच बरोबर भारतीय संघाचे मुख्य कोच ( ) यांनी देखील एडिलेड कसोटीतील पराभवानंतर खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरला. वाचा- भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी रवी शास्त्री यांच्या संदर्भात एक मोठा खुलासा केला. आर अश्विनशी बोलताना त्यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय खेळाडूंसाठी त्यांनी बीसीसीआयला थेट दौऱ्यावर न जाण्याची धमकी दिली होती. वाचा- काय झाले होते नेमकेवाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याच्या ४८ तास आधी आम्हाला कळाले की खेळाडू कुटुंबासोबत जाऊ शकत नाहीत. या निर्णयामुळे खेळाडू आणि स्टाफ सदस्य नाराज झाले. हे सर्व जण आयपीएलमुळे तीन महिन्यांपासून कुटुंबापासून दूर होते. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबाला नेता आले नाही तर सहा महिने झाले असते. त्या ४८ तासात दुबई, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ऑस्ट्रेलिया सरकार या बाबत खुपच कठोर होते. भारतीय संघातील सात खेळाडू दुबईत कुटुंबासह होते. अशा परिस्थिती रवी शास्त्री यांनी ऑनलाइन बैठक घेतली आणि बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले की, जर संघातील खेळाडूंना कुटुंबासोबत जाण्याची परवानगी मिळाली नाही तर आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. वाचा- शास्त्री म्हणाले माझ्या इतके ऑस्ट्रेलियाला कोणी ओळखत नाही. मी गेली ४० वर्षापासून तेथे जातोय. त्याच्याशी कसे वागायचे हे मला चांगलेच माहिती आहे . त्यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने कुटुंबासह दौऱ्यावर येण्याची परवानगी दिली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oaz2F8
No comments:
Post a Comment