नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. पण मोदी यांच्या ट्विटनंतर बीसीसीआयने नेमके काय म्हटले आहे, पाहा... मोदी यांनी आज भारतीय संघाचे कौतुक करताना एक ट्विट केले आहे. यामध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, " या महिन्यात भारतीय पीचवरुन एक अतिशय आनंदाची बातमी मिळाली. आपल्या भारतीय संघाने सुरुवातीच्या काही अडचणींनंतर शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आपल्या भारतीय संघातील खेळाडूंची अथक मेहनत आणि टीमवर्क हे नक्कीच प्रेरित करणारे आहे." मोदी यांनी ट्विट केल्यानंतर बीसीसीआयनेही त्यांना ट्विट करत आपली भावना सांगितली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी जे काही आपल्या संघाला शक्य आहे ते नक्कीच केले जाईल. तुम्ही ज्या शब्दांत भारतीय संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा उत्साह नक्कीच वाढेल. धन्यवाद मोदी जी..." ऑस्ट्रेलियामध्ये भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही यावेळी मोदी यांच्या ट्विटनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजिंक्यने आपल्या ट्विटमध्ये यावेळी म्हटले आहे की, " नरेंद्र मोदीजी, तुमच्या या कौतुकामुळे नक्कीच आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. भारताचे प्रतिनिधीतव करणे, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. यापुढे आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करु आणि भारतवासियांना प्रेरित करण्याचे काम करु." भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ०-१ अशा पिछाडीवरुन २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा अविस्मरणीय विजय मिळवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे यावेळी कौतुक केले आहे. भारतीय संघाचा हा विजय प्रेरणादायी होता, असे मोदी यांनी म्हटेल आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39wmmEq
No comments:
Post a Comment