नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत बऱ्याच अशा गोष्टी घडल्या ज्या अजून सर्वांसमोर आलेल्या नाहीत. या दौऱ्यात पंचांनी भारतीय संघाला मैदान सोडायला सांगितले होते, असा खुलासा भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केला आहे. ऑस्ट्रेलिमध्ये सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजवर प्रेक्षकांनी शिवागाळ केली होती, त्याचबरोबर त्याच्यावर वर्णद्वेषी टीकाही झाली होती. हे सर्व प्रकरण भारतीय संघाने मैदानावरील पंचांना सांगितले होते. त्यावेळी मैदानातील पंचांनी भारतीय संघाला मैदान सोडण्याचा सल्ला दिला होता. पण भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी नेमका काय म्हणाला, याचा खुलासा यावेळी सिराजने केला आहे. सिराज यावेळी म्हणाला की, " सिडनी कसोटीत प्रेक्षकांनी आमच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी आम्ही ही गोष्ट पंचांना सांगितली होती. पंचांनी आम्हाला त्यावेळी मैदान सोडायला सांगितले होते. पण यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे पंचांना म्हणाला होता की, आम्ही मैदान सोडून जाणार नाही, कारण आम्ही क्रिकेटचा सन्मान करतो. त्यानंतर आम्ही खेळतच राहिलो. पण या घटनेचा कोणताही विपरीत परीणाम आमच्यावर झाला नाही. या गोष्टीमुळे आमचे लक्ष विचलित झाले नाही. उलट या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला आणि आमचे मानसीत संतुलन अजून चांगले होत गेले." ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना सिरजाच्या वडिलांचे निधन झाले होते. पण भारताची सेवा करत असल्यामुळे तो मायदेशात वडिलांचे अंतिम दर्शन घेऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतामध्ये जेव्हा सिराज दाखल झाला तेव्हा पहिल्यांदा तो आपल्या वडिलांची जिथे दफनविधी करण्यात आली तिथे गेला. सिराजने आपल्या वडिलांना यावेळी श्रद्धांजली वाहिली. सिराज यावेळी भावुक झालेला पाहायला मिळाला. कारण सिराजने भारताकडून खेळावे हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. पण वडिलांचे निधन झाल्यावर त्याला त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये दाखल झाल्यावर सिराज सर्वात पहिली आठवण आली ती आपल्या वडिलांची...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XZ6rYq
No comments:
Post a Comment