नवी दिल्ली: Sex Scandals in Cricket संघ सध्या इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळत आहे. दोन्ही संघादरम्यान दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. पहिल्या कसोटीत यजमान श्रीलंकेचा पराभव झाला होता आणि आता दुसऱ्या कसोटीत देखील ते फार चांगल्या स्थितीत नाहीत. कसोटी सामना सुरू असताना या सामन्यापेक्षा श्रीलंका क्रिकेटमध्ये दुसऱ्या एका गोष्टीची चर्चा जोरदार सुरू आहे. ही चर्चा म्हणजे क्रिकेटमधील सेक्स स्कँडलची होय. वाचा- गुरुवारी श्रीलंकेच्या एका युवा खेळाडूला सेक्स स्कँडलमध्ये रंगे हात पकडण्यात आले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघ व्यवस्थापकाला या संदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे. क्रिकेटमध्ये ही पहिली घटना नाही ज्यामध्ये क्रिकेटपटू अशा घटनेत आठळले आहेत. याआधी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. शेन वॉर्न आघाडीवर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न खेळापेक्षा अशा गोष्टीमुळे चर्चात राहिला आहे. वॉर्नचे नाव अनेक महिलांसोबत आणि सेक्स स्कँडल्समध्ये जोडले गेले. एका ब्रिटिश नर्सला आपत्तीजनक मेसेज पाठवल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. कसोटीत ७०८ विकेट घेणाऱ्या वॉर्नचे फोटो अनेक महिलांसोबत सोशल मीडियावर येत असतात. वाचा- पाकिस्तानी अंपायर असद रउफचे भारतीय मॉडल सोबत प्रकरण, माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अन्य खेळाडूंचे २००० साली कराची हॉटेलमध्ये मुलांसोबतचे प्रकरण देखील चर्चेत आले होते. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल २०१२ साली आयसीसी टी-२० वर्ल्डकप दरम्यान ब्रिटिश महिलांसोबत सापडला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनवर दक्षिण आफ्रिकेची मॉडल वेनेसा निम्मोची फसवणूक केल्याचा आरोप होता. वाचा- श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संघातील युवा फिरकीपटूने मेडिकल स्टाफमधील महिला सदस्यासोबत हॉटेल रुममध्ये गैरव्यवहार केला. दरम्यान लंकेचे कोच मिकी आर्थर यांनी अशी घटना घडण्याची शक्यता नाही. कारण सर्व खेळाडू बायो बबलमध्ये आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t2ayl9
No comments:
Post a Comment