 
नवी दिल्ली, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ चेन्नईसाठी २७ जानेवारीला रवाना होणार आहे. पण यावेळी चेन्नईच्या हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ उद्या चेन्नईला पोहोचणार आहे. पण चेन्नईला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारतीय संघाला एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट म्हणजे करोना चाचणी. भारतीय संघातील खेळाडूंना करोना चाचणी केल्याशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारतीय संघाला करोना चाचणी करावी लागणार आहे. ज्या खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह येईल त्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या सर्व गोष्टींनंतर भारतीय संघ सराव करु शकतो. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना कसोटी मालिका खेळण्यासाठी या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी शानदार अशी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. त्याच टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. कुलदीपने गेल्या दोन वर्षात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत अ संघाविरुद्धच्या सामन्यात १६ ओव्हरमध्ये त्याने एकही विकेट घेतली नव्हती. त्यामुळेच कुलदीपच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली कामगिरी केली होती. चेन्नई हे सुंदर आणि अश्विनचे घरचे मैदान आहे. याचा फायदा घेण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36eWkn1
 
No comments:
Post a Comment