कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. गांगुलीला आता ICU मधून खासगी रुममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. रुग्णालयातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अँजिओप्लॅस्टीनंतर गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वाचा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीवर गुरुवारी पुन्हा एकदा अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंटही बसवण्यात आले होते. त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंटही बसवण्यात आले होते. वाचा- आता गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रात्री चांगली झोप देखील लागली. आरोग्या संदर्भातील सर्व गोष्टी सामान्य आहेत. आता त्यांना आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचे रुग्णालयाती अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा- प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या पथकाने गांगुलीवर गुरुवारी अँजिओप्लॅस्टी केली होती. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. छातीत दुखू लागल्याने बुधवारी गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यात गांगुलीला दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावे लागले. वाचा- याआधी सौरव गांगुलीला हृदय विकाराचा सौम्य धक्का बसला होता. तेव्हा त्याला ट्रिपल वेसेल डिजीज असल्याचे समोर आले होते. गांगुलीला सर्व प्रथम दोन जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3af62H7
No comments:
Post a Comment