Ads

Thursday, January 21, 2021

शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे भारतीय खेळाडूंना खेळता येणार इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना

मुंबई : बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार हे आपल्या कामांसाठी नेहमीच ओळखले जातात. सध्याच्या घडीला पवार हे क्रिकेटच्या कोणत्या संघनेतील पदावर नाहीत. पण तरीही पवार यांनी भारतीय खेळाडूंची मदत केली आहे. पवार यांच्या मध्यस्थीमुळेच भारताच्या खेळाडूंना इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना आता खेळता येणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाला चारही मुंड्या चीत करत आज भारताचे खेळाडू मुंबईत दाखल झाले आणि ते आपल्या घरीही पोहोचले आहेत. यामध्ये पवार यांचा मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पवार यांच्या मध्यस्थीमुळेच खेळाडू आपल्या घरी जाऊ शकले असून त्यांना इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना खेळताना आता कोणतीही अडचण येणार नाही. ऑस्ट्रेलियामधून भारतीय संघातील कर्णधार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि पृथ्वी शॉ हे सर्व दुबईमार्गे मुंबईत दाखल झाला. मुंबई महानगर पालिकेच्या नियमांनुसार परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागते. जर हे सर्व खेळाडू १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहिले असते तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळता आले नसते. ही मोठी समस्या भारतीय संघातील या समस्यांना जाणवत होती. त्यावर पवार यांनी मध्यस्थीकरून तोडगा काढल्याचे पाहायला मिळत आहे. पवार यांनी मुंबई मनपा अधिकारी आणि राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत काल रात्री उशिरापर्यंत या गोष्टीवर चर्चा केली. या यंत्रणेशी त्यांनी समन्वय साधला आणि त्यामुळेच भारतीय संघातील या सदस्यांना क्वारंटाइनच्या नियमांतून सुट देण्यात आली. जर ही सुट भारतीय संघातील सदस्यांना मिळाली नसती तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळता आले नसते. कारण भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीला सुरु होता आहे. त्यासाठी भारतीय संघ २७ जानेवारीला चेन्नई येथे पोहोचणार आहे. त्यामुळे जर क्वारंटाइनचा नियम भारतीय संघातील सदस्यांवर लागू झाला असता तर त्यांना २७ जानेवारीला चेन्नईला पोहोचता आले नसते आणि त्यांना पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले असते. पण पवारांच्या मदतीमुळे आता हे भारतीय संघातील सदस्य पहिला सामना खेळू शकतात. याबाबतचे पहिले वृत्त न्यूज १८ लोकमत या संकेतस्थळाने दिले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qEqkR8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...