ब्रिस्बेन : आतापर्यंत तुम्ही बरेच रनआऊट क्रिकेटमध्ये पाहिले असतील, पण एकाच चेंडूवर एकच फलंदाज चक्क दोनवेळा रनआऊट झाल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल. पण अशीच एक घटना घडली असून या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्याच्या घडीला बिग बॅश लीग सुरु आहे. या लीगमध्ये रविवारी सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स या दोन संघांतील सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. यावेळी स्ट्रायकर्सचा संघ फलंदाजी करत होता. यावेळी स्ट्रायकर्स संघाचा जॅक वेथराल्ड हा फलंदाज एकाच चेंडूवर दोनदा रनआऊट झाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय, पाहा... स्ट्रायकर्सचा संघ फलंदाजी करत असताना १० षटकात ही गोष्ट घडली. नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्ट्रायकर्सच्या एका फलंदाजाने फटका मारला. त्यावेळी जॅक हा दुसऱ्या बाजूला उभा होता. हा मारलेला चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागला आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्यावेळी जॅक हा तिथेच उभा होता. पण त्यावेळी तो बाद आहे की नाही, याचा निर्णय झाला नव्हता. त्यानंतर हा चेंडू स्टम्पला लागला आणि पुढे गेला. त्यामुळे स्ट्रायकर्सच्या फलंदाजांनी यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जॅक हा धाव घेण्यासाठी धवत गेला होता. पण जॅक धावत असताना चेंडू एका क्षेत्ररक्षकाने अडवला आणि त्याच्या दिशेने फेकला. त्यावेळी यष्टीरक्षकाने हा चेंडू टिपला आणि पुन्हा एकदा जॅकला रनआऊट करण्याचा प्रयत्न केला. जॅक आऊट आहे की नाही, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला. यावेळी जॅक जिथे पहिल्यांदा उभा होता आणि त्याला रनआऊट करण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर जॅक हा धाव घेण्यासाठी सरसावला. त्यावेळी यष्टीरक्षकाने जॅकला रनआऊट केले होते. त्यावेळीही जॅक रन आऊट असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच जॅक हा एकाच चेंडूमध्ये दोनदा रनआऊट झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YbXIlY
No comments:
Post a Comment