Ads

Friday, January 22, 2021

अजिंक्यला कसोटी संघाचे कर्णधार करा; विराट कोहलीचा फायदा

नवी दिल्ली: and ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर सर्व जण हंगामी कर्णधार (ajinkya rahane)चे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी अजिंक्यला कसोटी संघाचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. आता काही माजी क्रिकेटपटूंनी देखील हीच मागणी जाहीरपणे केली आहे. वाचा- भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंह बेदीने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजयाबद्दल रहाणेचे कौतुक केले. त्याच बरोबर एक सल्ला देखील दिला आहे. भारताचा नियमीत कर्णधार (virat kohli )ला एक फलंदाज म्हणून त्याचे करिअर दिर्घकाळ करण्यासाठी कसोटीचे कर्णधारपद अजिंक्यकडे सोपवावे. रहाणेचे नेतृत्व पाहिल्यानंतर टायगर पटौदी यांची आठवण येते. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांचा आक्रमकपणा आणखी वाढतो. वाा- रहाणेने ज्या पद्धतीने भारतीय संघाला संभाळले, ते पाहिल्यानंतर मला टायगर पटोदी यांची आठवण येते. पटोदी यांनी भारतीय क्रिकेटला नवी ओळख दिली होती. त्यांनी आमच्या क्रिकेटला भारतीयत्व दिले, असे बेदी म्हणाले. वाचा- मी ऑस्ट्रेलिया मालिकेत रहाणेला खुप जवळून पाहिले. कोणत्याही कर्णधाराची खरी ओळख तो गोलंदाजांचा कसा वापर करून घेतो यावर ठरते. नेमक्या याच ठिकाणी रहाणेने शानदार काम केले. कर्णधार गोलंदाजी करत असलेला बदल, क्षेत्ररक्षणची समज यासाठी ३ कसोटी पुरेसे आहेत. मी ऑस्ट्रेलिया दौऱ्या रहाणेच्या नेतृत्वात दोष शोधण्याचा खुप प्रयत्न केला. जेणेकरून माझ्यासारखे टीकाकार काही प्रश्न उपस्थित करू शकतील. पण मला एकही दोष आढळला नाही. वाचा- कर्णधारपद सांभाळणे १० टक्के स्किलचे काम तर ९० टक्के नशिबाचे काम असते. पण रहाणेकडे ५० टक्के स्किल तर ५० टक्के लक आहे. मला आशा आहे की रहाणेकडे कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद दिले जावे. मी प्रामाणिकपणे सांगतो की यामुळे विराटचे फलंदाजीचे करिअर मोठे होईल. भारताला विराट कोहली एक फलंदाज म्हणून मोठ्या कालावधीसाठी हवा आहे. त्यामुळेच कसोटीचे नेतृत्व रहाणे, टी-२०चे रोहित शर्माकडे द्यावे. पण मला वाटत नाही की निवड समिती असा निर्णय घेईल. कोहलीने इंग्लंड दौऱ्या आधी रहाणेला कर्णधारपदाची ऑफर द्यावी, असे बेदी म्हणाले. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NvmsDP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...