मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर यजमानांवर अनेक माजी खेळाडू टीका करत आहेत. आता या टीकेत आणखी एक भर पडली आहे. भारतीय संघाचे माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ( )यांनी ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्या युवा खेळाडूंची तुलना केली. वाचा- ऑस्ट्रेलिया संघातील युवा खेळाडू हे भारतीय संघाच्या युवा खेळाडूच्या तुलनेत अद्याप प्राथमीक शाळेतले वाटतात अशा शब्दात चॅपल यांनी डोस दिलाय. स्टार खेळाडू नसताना आणि दुखापतीग्रस्त असलेल्या भारतीय संघाने मालिका २-१ अशा अविश्वसनीय विजय मिळवला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. वाचा- आमचे युवा खेळाडू हे भारतीय युवा खेळाडूंसमोर काहीच नव्हते. त्यांना भारातीय खेळाडूंकडून १६ वर्षाखालील सामन्यांमध्ये आव्हान मिळते, असे चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियाचे युवा खेळाडू अद्याप ज्युनिअर संघातून खेळत असताना त्याच वेळी भारतीय युवा खेळाडू मात्र राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात आणि संघाला यश मिळून देत आहेत. वाचा- मला हे सांगताना वाईट वाटते पण विल पुलोवस्की आणि कॅमरून ग्रीन हे अद्याप प्राथमिक शाळेत आहेत, असे चॅपल म्हणाले. १९६०च्या दशकातील गाडीची स्पर्धा इलेक्टीकल गाडीशी कशी काय होऊ शकले. वाचा- बीसीसीआय युवा खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया फक्त ४४ मिलियन डॉलर खर्च करते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशी गुंतवणूक केली तर आपण देखील योग्य दिशेने प्रवास करू, असे ते म्हणाले. वाचा- भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणीच्या संघांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. यात कोणतीही शंका नाही की भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम पाच संघांपैकी एक आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KMcQU8
No comments:
Post a Comment