नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची घटना सर्वांना माहिती आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्षद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते. पण त्या शिवाय देखील अनेक वाइट अनुभव भारतीय खेळाडूंना आले आहे. असाच एक अनुभव फिरकीपटू ( )ने शेअर केला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत अश्विनला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही. हा खुलासा त्याने भारतीय संघाचे कोच आर श्रीधर यांच्यासोबत युट्यूब चॅनलवरील चर्चेत केला. वाचा- सिडनीत पोहचल्यानंतर आम्हाला कठोर नियमांसह बंद करण्यात आले. याच ठिकाणी एक अजब घटना घडली. दोन्ही संघातील खेळाडू बायो बबलमध्ये होते. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये असत तेव्हा भारतीय खेळाडूंना लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. वाचा- ही घटना जेव्हा घडली तेव्हा खुप वाइट वाटले. आम्ही एकाच बायो बबलमध्ये होतो. तुम्ही एकाच लिफ्टमध्ये आम्हाला जाऊ देत नाही. जे खेळाडू एकाच सुरक्षित जैव वातावरणात आहेत. ही गोष्ट पचवणे फार अवघड होते आमच्यासाठी असे अश्विनने सांगितले. अगदी प्रामाणीकपणे सांगायचे झाले तर तेव्हा खुप वाईट वाटले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यातील ३ सामन्यात अश्विन खेळू शकला. त्याने १२ विकेट घेतल्या. सिडनी कसोटीत त्याने हनुमा विहारी सोबत शानदार भागिदारी करत पराभव टाळला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iRNCQQ
No comments:
Post a Comment