नवी दिल्ली, : ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयात भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराचाही मोलाचा वाटा आहे. पण या दौऱ्यातील फलंदाजीबाबत पुजाराने आज एक मोठा खुलासा केला आहे. आपण फक्त चार बोटांनी बॅट पकडून का फलंदाजी करत होतो, यावर पुजाराने प्रकाशझोत टाकला आहे. पुजारा यावेळी म्हणाला की, " संघाला माझ्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहे, हे मला चांगलेच माहिती असते. त्यामुळे मी त्यानुसारच फलंदाजी करत असतो. तुम्हाला फक्त तुमच्या तंत्रावर विश्वास असायला हवा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आमच्यासाठीही खडतर असाच होता. या दौऱ्यात माझ्यावर चार बोटांनी फलंदाजी करायचीही वेळ आली होती. ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती, पण ते करणे माझ्यासाठी भाग होते." पुजारा पुढे म्हणाला की, " मेलबर्न येथे सराव करत असताना मला दुखापत झाली होती. त्यामुळे सिडनी आणि ब्रिस्बेन येथे फलंदाजी करणे माझ्यासाठी सोपेन नव्हते. कारण माझ्या हाताला वेदनाही होत होत्या. त्यावेळी बॅट पकडणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये मला पुन्हा एकदा दुखापत झाली. त्यामुळे माझ्या वेदनाही वाढल्या होत्या. त्यावेळी मला फक्त चार बोटांनीच बॅट पकडावी लागत होते, ही गोष्ट नक्कीच फार अवघड होती. पण ही गोष्ट मला करावी लागली, कारण त्यावाचून कोणताही पर्याय नव्हता." ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी पुजाराने ५६ धावांची दमदार खेळी साकारली आणि भारताचा पराभव होणार नाही, याची काळजी घेतली. यावेळी फलंदाजी करत असताना ११ चेंडू पुजाराच्या अंगावर आदळले. पण पुजाराने यावेळी हार मानली नाही. दुखापत गंभीर असली आणि वेदना जास्त होत असल्या तरी पुजाराने मैदान सोडले नाही. त्यावेळी जर पुजाराने मैदान सोडले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक आक्रमक झाला असता. पण पुजाराने मैदान न सोडता खेळपट्टीवर उभा राहण्याचा निर्णय घेतला. पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3adPuiU
No comments:
Post a Comment