नवी दिल्ली: Daughter Viral Photo ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची मुलगी इंडी रे ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फार मोठी फॅन आहे. वॉर्नरने अनेक वेळा याचा उल्लेख केलाय. ही गोष्ट विराटला देखील माहिती आहे. आता विराटने त्याच्या या सर्वात लहान अशा फॅनला एक खास गिफ्ट दिले आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. वाचा- विराट कोहलीने वॉर्नरच्या मुलीला स्वत:ची कसोटी सामन्यातील जर्सी भेट दिली आहे. वॉर्नरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खुप व्हायरल होत आहे. वाचा- मला माहिती आहे की आम्ही मालिका गमावली आहे. पण आमच्याकडे एक मुलगी आहे जी फार खुस आहे. धन्यवाद विराट कोहली. कसोटी संघाची जर्सी दिल्या बद्दल इंडीला ही जर्सी खुप आवडली. तिला वडील आणि एरॉन फिंचसह खुप आवडतो, असे वॉर्नरने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे. वाचा- वाचा- काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मुलगी झाली. विराटने मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हा वॉर्नरने शुभेच्छा देताना विराटला काही टिप्स हव्या असतील तर मला मेसेज कर, असे म्हटले होते. वाचा- विराट आणि वॉर्नर यांची मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे. वॉर्नरला भारतीय संस्कृती फार आडते. त्याच्या सोशल मीडियावर नेहमी भारतीय गाण्यांमधील डान्स दिसतात. तो आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3coDJIZ
No comments:
Post a Comment