नवी दिल्ली: गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. देशात करोना परिस्थिती सुधारल्यानंतर राष्ट्रीय स्थरावरील स्पर्धांना सुरूवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा सुरू झाली. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाचा- देशातील प्रतिष्ठीत अशी स्पर्धेचे या वर्षी आयोजन केले जाणार नाही. ८७ वर्षात प्रथमच असे घडणार आहे की जेव्हा रणजी स्पर्धा होणार नाही. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेनंतर बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफरने करोनाचा विचार करता विजय हजारे, दलीप आणि देवधर ट्रॉफी या स्पर्धा रद्द करून त्याच्या जागी रणजी ट्रॉफीचे आयोजन करावे असे मत व्यक्त केले होते. पण बीसीसीआयने या सत्रात विजय हजारे स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- ... विजय हजारे ट्रॉफीसह बीसीसीआयने महिला सिनिअर वनडे ट्रॉफी आणि अंडर १९ क्रिकेट मध्ये विनू मांकड वनडे ट्रॉफीचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. बीसीसीआयचे सचिव यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. वाचा- राज्य संघटनांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय हजारे ट्रॉफीसह सिनिअर महिला वनडे ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. त्याच बरोबर विनू मांकड ट्रॉफी (१९ वर्षाखालील) चे आयोजन होणार आहे, असे शहा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. वाचा- करोना व्हायरसमुळे भारतात पुढील महिन्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून होणार आहे. या महिन्यात बीसीसीआयने देशांतर्गत सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेची अंतिम लढत ३१ जानेवारी रोजी होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iZLPcg
No comments:
Post a Comment