दुबई: मैदानावरील एखाद्या घटनेमुळे क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची घटना काही नवी नाही. सामना सुरू असताना अशा अनेक घटना ज्यावर खेळाडू ट्रोल होतात. पण जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणाऱ्या संघटनेने जर एखाद्या खेळाडूला ट्रोल केले तर... होय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने पाकिस्तानच्या एका खेळाडूला चक्क सोशल मीडियावरून ट्रोल कले आहे. आता आयसीसीनेच ट्रोल केले म्हटल्यावर अन्य युझर्स मागे कसे राहतील. वाचा- पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी जलद गोलंदाज हसन अलीचा एक फोटो आयसीसीने गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केला. आयसीसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हसन अलीचे दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो एक शानदार शॉट मारताना दिसतोय. या फोटोत या फोटोला आयसीसीने प्रोफाइल फोटो म्हटले आहे तर दुसऱ्या फोटोत त्याचा पूर्ण फोटो दाखवला आहे ज्यात तो बोल्ड झालेला दिसतोय. या फोटोला आयसीसीने फूल्ल फोटो असे म्हटलय आणि हसणारी इमोजी टाकली आहे. वाचा- वाचा- आयसीसीने हसन अलीला ट्रोल केल्यामुळे बाकीचे युझर्सने ही संधी सोडली नाही. पाकिस्तान नेहमी भारतावर टीका करत असते. अशात भारतीय युझर्सनी ही संधी सोडली नाही. कराचीत सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने सामन्यावर पकड मिळवली होती. आफ्रिकेने ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. त्याच्याकडे फक्त २९ धावांची आघाडी आहे. पाकने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ckoLDS
No comments:
Post a Comment