नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेची सुरूवात ५ फेब्रुवारीपासून होणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. या शिवाय पाच टी-२० लढती आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटीची सुरुवात चेन्नईतून होईल. पहिल्या दोन कसोटी चेन्नईत होणार आहेत. त्यानंतरच्या दोन कसोटी या अहमदाबाद येथील होतील. चेन्नईत आतापर्यंत झालेल्या ३२ पैकी १४ कसोटी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सहा सामन्यात पराभव झाला तर ११ सामने ड्रॉ झाले आहेत. चेन्नईत भारताने ७ बाद ७५९ ही सर्वोच्च धावसंख्या २१६ साली इंग्लंडविरुद्ध केली होती. तर याच मैदानावर ८३ ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. १९७७ साली इंग्लंडने भारताचा ८३ वर ऑल आउट केला होता. या मैदानावर सुनील गावस्कर यांनी १२ कसोटीत १ हजार १८ धावा केल्या आहेत. त्यांनी चेन्नईत ३ शतक झळकावली आहेत. वाचा- या शिवाय चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ९ पैकी ५ कसोटी विजय मिळवला आहे. या दोन्ही संघातील अखेरच्या लढतीत भारताने ७५ धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने ३०३ तर केएल राहुलने १९९ धावा केल्या होत्या. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी चांगली झाल्याने पहिल्या दोन्ही कसोटीत भारताचे पारडे जड मानले जाते. जाणून घेऊयात भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक... (ind vs eng 2021 full schedule) कसोटी मालिका पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी- सकाळी ९.३० वाजता दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी- सकाळी ९.३० वाजता तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट)- दुपारी २ वाजता चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च- सकाळी ९.३० वाजता वाचा- टी-२० मालिकेचे वेळापत्रक पहिली मॅच- १२ मार्च, संध्याकाळी ६ वाजता दुसरी मॅच- १४ मार्च, संध्याकाळी ६ वाजता तिसरी मॅच- १६ मार्च, संध्याकाळी ६ वाजता चौथी मॅच- १८ मार्च, संध्याकाळी ६ वाजता पाचवी मॅच- २० मार्च, संध्याकाळी ६ वाजता या सर्व लढती अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर होणार आहेत. वनडे सामन्यांचे वेळापत्रक पहिली वनडे- २३ मार्च, दुपारी २.३० वाजता दुसरी वनडे- २६ मार्च, दुपारी २.३० वाजता तिसरी वनडे- २८ मार्च, सकाळी ९.३० वाजता या सर्व लढती पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होतील. वाचा- लाइव्ह टेलिकास्ट भारत आणि इंग्लंड यांच्यातील सर्व मालिकेचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39wusgj
No comments:
Post a Comment