नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळून मायदेशात परतलेल्या भारतीय खेळाडूच्या मागे घरातील लोक एका गोष्टीसाठी मागे लागले आहेत. आता यावर काय करायचे यासाठी त्याने चक्क सोशल मीडियावरून मदत मागितली आहे. ऑस्ट्रेलियात मिळालेल्या ऐतिहासिक विजयात भारताचा विकेटकीपर ()ने महत्त्वाचे योगदान दिले होते. सिडनी कसोटी असो की ब्रिस्बेन येथील अखेरची कसोटी या दोन्ही सामन्यात त्याने भारतीय चाहत्यांचे मन जिंकले. वाचा- भारतात परतल्यानंतर पंतचे जोरदार स्वागत झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर घरी परतलेल्या पंतने त्याची एक अडचण सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यावर सल्ला देण्यास सांगितले. वाचा- वाचा- पंत म्हणतो, जेव्हापासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत आलो आहे तेव्हापासून घरातील मागे लागले आहेत की नवे घर घे आता. गुडगाव कसे वाटते? अन्य कोणता पर्याय असेल तर सांगा. त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रत्येक जण स्वत:च्या शहरात त्याला बोलवू लागले. काहींनी जयपूर, काहींनी जोधपूर तर एकाने हैदराबादला घर घेण्यास सांगितले. वाचा- एका युझरने पंतला विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर घेण्यास सांगितले. तर अन्य एकाने लग्न करून घर जावाई हो. म्हणजे घर विकत घेण्याची गरज लागणार नाही असा अजब सल्ला दिलाय. वाचा- एका भारतीय युझरने तर थोडे दिवस थांब पाकिस्तान व्याप्त काश्मीर रिकामे होणार असल्याचे म्हटले आहे. पंतच्या या ट्विटवर अशी अनेक मजेशीर उत्तरे दिला जात आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qUdyxK
No comments:
Post a Comment