नवी दिल्ली: 2021 भारतीय क्रिकेट संघाचा नियमीत कर्णधार ( ) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर येण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याने बाळाच्या जन्मासाठी सुट्टी घेतली होती. आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो पुन्हा संघाचे नेतृत्व करणार आहे. वाचा- विराट कोहलीने भारतीय संघाकडून खेळण्यास सुरूवात केल्यापासून २०२० हे असे एकमेव वर्ष ठरले ज्यात त्याला शतक करता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला शतकाची संधी होती पण तो धावबाद झाला. त्याआधी वर्षभर करोनामुळे भारतीय संघाला फार क्रिकेट खेळता आले नाही. वाचा- आता विराट २०२१ची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटीत विराट कोहलीला एक विक्रम करण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध विराटने मोठी खेळी करावी अशी प्रत्येक भारतीय चाहत्याची इच्छा असेलच, पण पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात विराटला वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांना मागे टाकण्याची संधी आहे. वाचा- विराटने कसोटीत कर्णधार म्हणून आतापर्यंत ५ हजार २२० धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध १४ धावा करताच तो लॉईड यांना मागे टाकून कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचेल. वाचा- या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅहम स्मिथ ८ हजार ६५९ धावांसह पहिल्या, ६ हजार ६२३ धावांसह एलन बॉर्डर दुसऱ्या तर रिकी पॉटिंग ६ हजार ५४२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3px0n5S
No comments:
Post a Comment