चेन्नई: पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरूवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार असून पहिल्या दोन लढती चेन्नईच्या चेपॉक () अर्थात एम ए चिदंबरम मैदानावर () होणार आहे. या मैदानावर होणाऱ्या लढती आधी भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या दोन लढती चेन्नईत होतील. तर उर्वरीत दोन लढती अहमदाबाद येथे होणार आहेत. पाच फेब्रुवारीपासून पहिली कसोटी तर १३ ते १७ दरम्यान दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ९ कसोटी सामने झाले आहेत. यापैकी पाच सामन्यात भारताने तर इंग्लंडने तीन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघात १९८२ साली झालेली कसोटी मॅच ड्रॉ झाली होती. वाचा- भारताने २०१६ साठी इंग्लंडचा या मैदानावर ७५ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात करूण नायरने त्रिशतक झळकावले होते. विरेंद्र सेहवागनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज होता. त्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात मोइन अली (१४६) आणि जो रूट (८८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४७७ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल भारताने ७५९ धावांवर डाव घोषित केला. भारताचा कसोटीतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. पहिल्या डावात भारताकडून नायरने नाबाद ३०३, लोकेश राहुलने १९९ धावा केल्या. इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त २०२ धावा करता आल्या. वाचा- भारतीय संघाने चेपॉक मैदानावर आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १४ मध्ये विजय, ६ मध्ये पराभव तर ११ सामने ड्रॉ झालेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YfTcmE
No comments:
Post a Comment