![](https://maharashtratimes.com/photo/80498770/photo-80498770.jpg)
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण यावेळी भारताच्या कोणत्या ११ खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते, यासाठी भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने आपला खास संघ बनवला आहे. गंभीरने आपल्या संघात कोणत्या ११ खेळाडूंना संधी दिली आहे, पाहा... गंभीरने यावेळी आपला संघ निवडताना मयांक अगरवालऐवजी शुभमन गिलवर जास्त विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताच्या सलामीची धुरा गंभूरने गिलच्या हातामध्ये सोपवली आहे. गिलबरोबर यावेळी रोहित शर्मा सलामीला येईल, असे गंभीरने म्हटले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचा क्रमांक गंभीरच्या संघात आहे. गंभीरने यावेळी यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतवर विश्वास कायम दाखवला आहे. त्यामुळेच वृद्धिमान साहाचा विचार गंभीरने केला नसून यष्टीरक्षणाची जबाबदारी ही पंतवर सोपवली आहे. त्याचबरोबर गंभीरने यावेळी संघात तीन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. यामध्ये आर. अश्विनचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना न खेळणाऱ्या कुलदीप यादवलाही संघात स्थान दिले आहे. आतापर्यंत एकही कसोटी सामना चन खेळणारा अक्षर पटेलही यावेळी गंभीरच्या संघात पाहायला मिळत आहे. गंभीरने यावेळी आपल्या संघात दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. कारण भारतामध्ये वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा मिळत नाही. त्यामुळे गंभारने आपल्या या संघात जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय दौऱ्यासाठी इंग्लंडचा संघ काल दाखल झाला. इंग्लंडच्या संघातील सर्व व्यक्तींची यावेळी करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतरच इंग्लंडच्या संघाला हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता सात दिवस इंग्लंडच्या संघाला क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला फक्त तीन दिवसच सराव करण्यासाठी मिळणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YzToNL
No comments:
Post a Comment