![](https://maharashtratimes.com/photo/80445125/photo-80445125.jpg)
मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडला 'द वॉल' असे म्हटले जायचे. द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सहजा सहजी विकेट पडू देत नसत. द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेईल असा प्रश्न विचारला जात असे. पण त्याच काळात कसोटी क्रिकेटमध्ये एका खेळाडूचा उदय झाला. भारताची नवी वॉल अन्य कोणी नसून चेतेश्वर पुजार होय. वाचा- भारतीय क्रिकेट संघाचा हा संकटमोचक आज (२५ जानेवारी) ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. १९८८ साली आजच्या दिवशी पुजाराचा राजकोट येथे जन्म झाला होता. भारतीय संघाने नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवला. या मालिकेतील अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीतील विजयात पुजाराची महत्त्वाची भूमिका होती. त्याने २११ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाचे जलद गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड या गोलंदाजांना अडचणीत टाकले. कांगारूच्या गोलंदाजांनी पुजाराला बाउसर चेंडू टाकून बाद करण्याचे प्रयत्न केले. पण अनेकदा चेंडू अंगावर लागून देखील तो विकेटवर टिकून राहिला. एक चेंडू तर त्याच्या बोटांना लागला तेव्हा ते खालीच बसला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत पुजाराने चिवट फलंदाजी केली. वाचा- पुजाराने ८१ कसोटीत ६ हजार १११ धावा केल्या. ज्यात १८ शतक आणि २८ अर्धशतक केली आहेत. त्याची सरासरी ४७.७४ इतकी आहे. कसोटीत नाबाद २०६ धावा ही पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाच्या वनडे संघात त्याला फार संधी मिळाली नाही. त्याने ५ वनडेत फक्त ५१ धावा केल्या आहेत. वाचा- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पुजाराने ४ कसोटीतील ८ डावात ३३.८७च्या सरासरीने २७१ धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता. आता पुजाराचे पुढील लक्ष्य इंग्लंडविरुद्ध भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेवर असेल. या दोन्ही संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. >> कसोटीत वेगाने १ हजार धावा करणारा दुसरा भारतीय >> एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय (५११) >> सर्व कसोटीत पाचव्या दिवशी फलंदाज करणारा तिसरा तर जगातील नववा फलंदाज >> ऑस्ट्रेलियात २०१८-१९ आणि २०२०-२०२१ च्या ऐतिहासीक विजयातील सदस्य
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ZJL03
No comments:
Post a Comment